सातारा:पडळ येथील खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याने या गळीत हंगामातही सात लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वर्षी या कारखान्याचा आलेख चढता आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.साखर कारखान्याचा सहावा गळीत हंगाम रोलर मेल पूजन कार्यक्रम कारखाना स्थळावर झाला.त्यावेळी ते बोलत होते.को-चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, प्रीती घार्गे, कृष्णात शेंडगे, अशोक गोडसे, संजय जाधव, अमोल पवार, हणमंत घोरपडे, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, अजित मोरे आदी उपस्थित होते.
को-चेअरमन घोरपडे म्हणाले की, कारखान्याने डिस्टिलरी प्रकल्प सुरू केल्याने आर्थिक स्थिती चांगली आहे. साखरेचे उत्पादन वाढविण्याबरोबरच विविध प्रकल्प व प्रयोग राबविले जात आहेत. यावेळी चांगला दर व वेळेत बिल देण्याचे नियोजन केले आहे.दरम्यान, कार्यकारी संचालक घोरपडे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी गळीत हंगाम १२० दिवस चालला.६ लाख १८ हजार मेट्रिक टन गाळप पूर्ण करून ६ लाख ७० हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.यंदा त्यापुढील टप्पा सहजपणे गाठू, असेही ते म्हणाले.