पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आगामी गाळप हंगामाच्या तयारीचा प्रारंभ अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांच्या हस्ते मिल रोलर पूजनाने करण्यात आला. यावेळी यंदाच्या गाळप हंगाम, २०२४-२५ मध्ये कारखान्याने १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी घोषणा अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेसहा ते सात लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले की, हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करणार आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तोडणी यंत्रणेचे करार करण्यात येत आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात आडसाली ८ हजार ९९४, पूर्वहंगामी ८१३, सुरू १ हजार ३४४, खोडवा ६ हजार ७२५ अशा एकूण १७ हजार ८७६ एकर उसाची नोंद आहे. कारखान्याने गेल्या हंगामात सुरुवातीला ३,००० रुपये आणि नंतर २०० रुपयांचे बिल दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, मदननाना देवकाते, तानाजीकाका देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप राजेंद्र ढवाण, अनिल तावरे, नितीन सातव, स्वप्निल जगताप, बन्सीलाल आटोळे, संजय काटे, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, अॅड. जी. बी. गावडे, सागर जाधव, पंकज भोसले, संगीता
कोकरे, सुरेश देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.