कोल्हापूर :पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया भारत शुगरच्या दत्त-आसुर्ले पोर्ले युनिटच्यावतीने कारखाना कार्यक्षेत्रातील ४३ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अभ्यास दौरा केला.या शेतकऱ्यांनी ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे.चार दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून ऊस शेतीविषयक सखोल ज्ञान मार्गदर्शन मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून दालमियाच्या ऊस शेती विकास उपक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष प्रायोगिक प्लॉट भेटींचा यात समावेश आहे.या शेतकऱ्यांच्या दौरा प्रारंभप्रसंगी युनिटचे जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एच.आर.प्रमुख सुहास गुडाळे, असिस्टंट जनरल मॅनेजर(केन), संग्राम पाटील, शिवप्रसाद देसाई, चिंतामणी पाटील, शिवप्रसाद पडवळ, मनीष अग्रवाल उपस्थित होते.