भारतीय रेल्वेने जून 2024 मध्ये 135.46 MT मालवाहतुकीचा टप्पा गाठला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील म्हणजे जून 2023 च्या 123.06 MT च्या तुलनेत सुमारे 10.07% ची वाढ नोंदवली आहे. भारतीय रेल्वेने या कालावधीत प्राप्त केलेला मालवाहतुकीचा महसूल जून 2023 च्या 13,316.81 कोटी रुपयांच्या तुलनेत 14,798.11 कोटी रुपये इतका असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 11.12% ची वाढ दिसून आली.
भारतीय रेल्वेने या कालावधीत 60.27 MT कोळसा (आयात केलेला कोळसा वगळून), 8.82 MT आयात कोळसा, 15.07 MT लोहखनिज, 5.36 MT पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 7.56 MT सिमेंट (क्लिंकर वगळता), 5.28 MT क्लिंकर, 4.21 MT अन्नधान्य, 5.30 MT खते, 4.18 MT खनिज तेल, कंटेनर सुविधेच्या माध्यमातून 6.97 MT आणि इतर वस्तूंमध्ये 10.06 MT इतकी वाहतूक केली.
”हंग्री फॉर कार्गो” हा मंत्र अनुसरत भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहककेंद्रित दृष्टीकोन आणि सुगम धोरण निर्मितीद्वारे समर्थित व्यवसाय विकास युनिट्सच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यात मदत झाली.
(Source: PIB)