सोलापूर : थकीत ऊस बिलासाठी १२ जुलै रोजी हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा

सोलापूर :शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह थकीत ऊस बिले १० जुलैपर्यंत द्यावीत, अन्यथा १२ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते प्रा.रामदास झोळ यांनी दिला आहे.याबाबत नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत प्रा.झोळ यांनी सांगितले की, साखर आयुक्तांनी कारखान्यांवर नियमानुसार आरआरसी कारवाईचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी तसेच उपप्रादेशिक सह संचालक (साखर) सोलापूर यांना दिलेल्या आदेशानुसार, कारखान्यांवर कारवाई झाली आहे.मात्र, आजपर्यंत ऊस बिले मिळाली नाहीत.ती त्वरित मिळावीत अशी अपेक्षा आहे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ तळेकर, संदीप तळेकर, प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापू तळेकर, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here