ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र काढून घेण्याचे आवाहन

सातारा : सातारा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ ऊस तोडणीत सक्रीय असलेल्या कामगारांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सर्व्हे करून ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्र देण्यात येत आहेत. याबाबत समाज कल्याण खात्याचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी ऊस तोड कामगारांनी जेथे वास्तव्यास असतील, तेथील ग्रामसेवकांशी संपर्क साधून ओळखपत्रे काढून घ्यावीत, असे आवाहन केले आहे.

ऊस तोडणी कामगारांसाठी एक देश एक रेशनकार्ड योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प राबविणे, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहांची सोय, कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू करणे आदी उपक्रमांचा समावेश यात आहे. ऊसतोड कामगारांचे शून्य ते सहा वयोगटातील बालकास सकस आहाराची/ किंवा अंगणवाडीची सुविधा दिली जाते. यासाठी त्यांना ओळखपत्राची गरज आहे. त्यांनी ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here