सुवा : फिजी शुगर कॉर्पोरेशनने जुना साखर कारखाना खरेदी करण्यासाठी चीनसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. हा कारखाना राकिराकी येथे उभारला जाईल, अशी माहिती साखर मंत्री चरण जेठ सिंग यांनी दिली. फिजी येथे शेतकरी दिनानिमित्त आयोजित साखर संशोधन संस्थेतील कार्यक्रमात मंत्री सिंह यांनी सांगितले की, नव्या कारखान्याची किंमत २५० दशलक्ष डॉलर्स असेल. आम्ही चीनमधून हा कारखाना आणण्यासाठी वाटाघाटी करत आहोत. हा सेकंड हँड कारखाना केवळ चार वर्ष जुना आहे. त्याची खरेदी निम्म्या किमतीत केली जावी यासाठी आमच्या वाटाघाटी सुरू आहेत.
ते म्हणाले की, आम्ही कारखाना पाहिला आहे. एफएससीचे अध्यक्ष, सीईओ भान सिंग आणि अभियंत्यांचे एक पथकही कारखाना पाहणीसाठी गेले होते. साखर मंत्री चरण जेठ सिंह म्हणाले की, या कारखान्यामुळे सर्वजण खुश आहेत. आता निधी मिळण्यास थोडा वेळ लागेल. एकदा निधी मिळताच आम्ही या कारखाना सुरू करू शकू. जर आपण या प्रस्तावावर पुढे गेलो तर चिनमधील अभियंते कारखाना तेथून बोटीच्या माध्यमातून येथे आणून बसवतील. हा कारखाना सुरळीत सुरू राहिल याची खात्री करण्यासाठी ते दोन वर्षे येथे राहतील आणि नंतर आमच्याकडे हस्तांतरीत करतील. मंत्री सिंह ते म्हणाले की, नवीन राकिराकी कारखान्यामध्ये प्रक्रियाकृत साखरेचे उत्पादन केले जाईल. सध्या आपली सर्व शुद्ध साखर आयात केली जाते. फिजी आणि पॅसिफिक बेटांमध्ये परिष्कृत साखरेला मोठी मागणी आहे आणि या साखर चांगली किंमत आहे.