सातारा : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ४६ शेतकरी सहभागी झाले आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने या शेतकऱ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना संचालक संजय पाटील, वसंतराव शिंदे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, वैभव जाखले, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांनी शुभेच्छा दिल्या.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. यंदाच्या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेशमधील हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. शिबिरात माती परीक्षण, खत, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापराविषयी मार्गदर्शन केले जाईल. शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) विकास आभाळे, प्रॉडक्शन मॅनेजर शशिकांत पाटील, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, गोविंद मोहिते, डॉ. हर्षल निकम, संजय नलवडे, डॉ. विजय कुंभार, अजय दुपटे, शिवाजी बाबर आदी उपस्थित होते.