अहिल्यानगर : आ. शंकरराव गडाख-पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ साठीच्या मिल रोलरचे पूजन ज्येष्ठ संचालक नारायण लोखंडे व बबन दरंदले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, तसेच संचालक भाऊसाहेब मोटे, बापूसाहेब शेटे, बाळासाहेब बनकर, लक्ष्मण पांढरे, रंगनाथ जंगले, कार्यकारी संचालक एस. एस. बेल्हेकर, व्ही. के. भोर उपस्थित होते. कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये कारखान्याने ७ लाख ८८ हजार मेट्रिक टन ऊसगाळप केले आहे. गतवर्षी राज्यामध्ये पाऊसमान कमी झाल्याने कार्यक्षेत्रात ऊस लागवडीमध्ये काही अंशी घट झाली. त्यामुळे येणारा गळीत हंगाम कमी कालावधीचा राहण्याची शक्यता आहे.
येत्या गळीत हंगामात कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गळीत करण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने नियोजन केले आहे. त्यानुसार ऊसतोड वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम चालू आहे. तसेच कारखाना मशिनरीचे ओव्हर ऑईलिंगची कामे जोमाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिल रोलरचे देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रोलर पूजन कार्यक्रमाला कारखान्याचे सरव्यवस्थापक एस. बी. दरंदले, शेतकी अधिकारी व्ही. एच. फाटके, एस. डी. पवार, मुख्य अभियंता डी. बी. नवले, उत्पादन व्यवस्थापक बी. एन. शेवाळे, एस. बी. साळुंके, कार्यालयीन अधीक्षक वाय. एस. घावटे, डिस्टलरी व्यवस्थापक बी. एम. दरंदले, अभियंता आर. के. दरंदले, कामगार युनियनचे अशोक पवार व डी. एम. निमसे आदी उपस्थित होते.