विठ्ठलराव शिंदे कारखान्यास उच्चांकी गाळपासाठी नॅशनल फेडरेशनचा पुरस्कार : चेअरमन, आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : नवी दिल्लीच्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिटला सन २०२२-२३ या गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप/उच्च साखर उतारा विभागात सहकार क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर येथे १८ लाख ४१ हजार ४२० मे. टन विक्रमी ऊस गाळप झालेले आहे. यापूर्वी कारखान्याला उच्चांकी गाळपासाठी २०१४-१५, २०१७-१८ व २०२१-२२ या वर्षासाठी पुरस्कार मिळाले आहेत. आताच्या या पुरस्काराचे वितरण लवकरच दिल्ली येथे हस्ते होणार आहे

संस्थापक चेअरमन आ. शिंदे म्हणाले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्याचे मूल्याकंन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी कारखान्यांचे काटेकोर मल्यमापन केले जाते. त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कारखान्याची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here