थकीत ऊस बिलावर व्याज न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत : प्रहार जनशक्ती

पुणे : शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांनी पंधरवडा ऊस दर नियम कायद्यानुसार व्याज देणे बंधनकारक आहे. अशा व्याज न देणाऱ्या कारखान्यांना नव्या हंगामात गाळप परवाना देऊ नये. जर परवाने दिल्यास साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख अभिजित पोटे यांनी दिला आहे. पोटे यांनी पुण्यात साखर संकुलात साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची भेट घेतली. यावेळी पंधरवडा नियमानुसार, काही कारखान्याने बिल दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. साखर आयुक्तांनी प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्यानंतर नगर जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर जप्तीची, आरआरसीची कारवाई केली आहे असे सांगितले. जिल्ह्यातील ९९ टक्के साखर कारखान्यानी नियमानुसार एफआरपी दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पोटे यांनी यावर आक्षेप घेतला. पंधरवडा व्याजास शेतकऱ्यांनीच नकार दिला आहे, असे साखर आयुक्तांनी सांगितले. त्यावर अशा प्रकारचे अॅग्रीमेंट शेतकऱ्यांनी केलेले नाही. साखर कारखान्यांनी बोगस कागदपत्रे सादर केली आहेत, असा आरोप पोटे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here