ऊस लागवडीस शेतकऱ्यांची धावपळ, एकरी सहा हजार रुपयांपर्यंत खर्च

पुणे:समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी शेतीकामात गुंतले आहेत.अद्याप उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.मात्र, शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीला सुरुवात केली आहे. उसाच्या उसाची लागवडीस सुरुवात झाली आहे.यंदादेखील एकरी सहा ते सात हजार रुपये बियाणे असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.शिवाय, ऊस लागवडीसाठी एकरी सहा हजार रुपये खर्च येत आहे.

शेतकरी को ८६०३२ या उसाला अधिक पसंती देत आहे.याबाबत शेतकर्‍यांनी सरंगितले की, उसाची लागवडीसाठी साधारणतः एकरी वीस ते तीस हजार रुपये खर्च येतो. यात नांगरट, सरी सोडणे, खते व बियाणे आदींचा समावेश आहे.सद्यस्थितीत दुष्काळाच्या झळा सोसून शेतकरी नव्याने पिकाची लागवड करीक आहेत.त्यात शेतमजुरांची टंचाई जाणवत आहे.मात्र, या भागात ऊस लागवड वाढल्याचे दिसून येत आहे. पुढील हंगामात उसाची कमतरता भासू नये,यासाठी साखर कारखाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस लागवड करावी,यासाठी अनुदानाच्या माध्यमातून मदतही करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here