नवी दिल्ली: केंद्र सरकारने 2025 पर्यंत E20 संमिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्र सरकार हे लक्ष्य गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. केवळ उसापासूनच नव्हे तर ध्यानापासून इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी आता मक्याचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने ‘इथेनॉल उद्योगांच्या = क्षेत्रात मका उत्पादनात वाढ’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. मका उत्पादन वाढवण्यासाठी IIMR ने महाराष्ट्रासह 15 राज्यातील शेतकऱ्यांना सुधारित मका वाणांचे बियाणे वितरित केले.
झी न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या प्रकल्पात एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत DHM-117 आणि DHM-121 वाणांचे 3000 किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे IIMR चे वरिष्ठ मका शास्त्रज्ञ डॉ. एस.एल. जाट म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत भारतातील 15 राज्यांमध्ये 15 क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 78 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या 15 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि हरियाणा यांचा समावेश आहे.