नागनाथअण्णांच्या प्रयत्नांमुळे साखर कारखानदारीला करांपासून दिलासा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

सांगली:आज नव्या पिढीपुढे आदर्श कोणाचा ठेवायचा, हा प्रश्न आहे.अशावेळी नागनाथअण्णा नायकवडी यांचा विचार अनेक पिढ्यांना पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा येथे केले. हुतात्मा संकुलाच्यावतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव नाईक होते.केंद्र सरकारने सहकारी साखर कारखानदारीवर २९ हजार कोटी रुपयांचा आयकर बसवला होता.नागनाथअण्णांनी त्याविरोधात आंदोलन उभे केल्याने करमाफी झाली अशी आठवणही पाटील यांनी यावेळी सांगितली.यावेळी वैभव नायकवडी यांनी हर्षवर्धन पाटील यांना कारखानदारीसमोरील अडचणींचे आणि विविध मागण्यांचे निवेदन दिले.

प्रारंभी क्रांतिवीर नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा किसन अहिर, कुसुमताई नायकवडी यांना अभिवादन करण्यात आले.वैभव नायकवडी म्हणाले की, अण्णांनी दुष्काळग्रस्त जनतेसाठी पाणी परिषदेचा लढा उभा केला.त्यामुळे सरकारला कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करावे लागले, तर धरणग्रस्तांसाठी सरकारला पुनर्वसनाचे कायदे करायला भाग पाडले.यावेळी खासदार धैर्यशील माने, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, प्राचार्य एस.आर.चोपडे यांची भाषणे झाली. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, प्राचार्या सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, वीरधवल नायकवडी, संचालिका विशाखा कदम, वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, अजित वाजे, यशवंत बाबर उपस्थित होते.बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here