बिहार : पुरात हजारो हेक्टरमधील ऊस पिक नष्ट, शेतकरी भितीच्या छायेत

गोपालगंज : गोपालगंजमधील शेतकऱ्यांना पुरामुळे होणारी पिकांची नासाडी सोसावी लागत आहे. गंडक नदीच्या प्रवाहामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीत पाणी साचले आहे. डायरा परिसरातील ऊसाचे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अतिवृष्टीमुळे पिके बुडाली आहेत. अलीकडे वाल्मिकी बॅरेजमधून ४ लाख ४० हजार क्युसेक पाणी सोडल्याने गंडक नदीला पूर आला आहे. त्यामुळे हजारो एकरात लावलेली उसाची पिके पाण्यात गेली आहेत.

याबाबत भारत साखर कारखान्याचे उपव्यवस्थापक आशिष खन्ना म्हणाले की, ऊसाचे पीक उद्ध्वस्त झाल्याने त्याचा परिणाम कारखान्याच्या गळीत हंगामावर होणार आहे. सिधवालिया येथील या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील डायरा व सखल भागातील ३६ हजार हेक्टर ऊस पिकांपैकी ८ हजार हेक्टर पीक पुराच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पिकांची झालेली दुर्दशा पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. पुरामुळे सहा गटांतील पन्नास टक्क्यांहून अधिक पिके नष्ट होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे उसाचे पीक उद्ध्वस्त झाले असून साखर कारखान्यांसमोरील संकटही गडद होऊ लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here