‘गोडसाखर’ कारखाना वेळेवर सुरू करा : प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : प्रांताधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) वेळेत व नियोजनबद्ध सुरू होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी उत्पादक व सभासदांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले. मागील काही वर्षांपासून गोडसाखर कारखाना निष्क्रिय कारभारामुळे अधोगतीकडे जात आहे. गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्या कर्जातून कारखाना दुरुस्तीसाठी ५५ कोटी खर्चूनही केवळ १ लाख ३८ हजार टन उसाचेच गाळप झाले. कारखान्याला २० ते २५ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

याबाबत माजी संचालक चंद्रकांत जांगनुरे, सुरेश देसाई, चंद्रकांत सावंत, राजगोंडा पाटील, प्रशांत देसाई, अॅड. हेमंत कोलेकर, कृष्णराव वाईंगडे यांच्यासह २५० सभासदांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थकीत पगार या बाबतीत कोणतेच नियोजन नसल्याने येणारा हंगामही वेळेवर सुरू होण्याची शाश्वती दिसत नाही. मागील काही वर्षांपासून शेतकरी, सभासदांना साखर देणेही बंद झाले आहे. अध्यक्ष व संचालक मंडळाच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराने सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना दिवसेंदिवस वाहतूकदार कुटुंबांची अवस्था विकट झाली आहे. कारखाना वेळेत सुरू होण्यासाठी प्रांताधिकारी स्तरावर पाठपुरावा व्हावा. कारखाना वेळेत सुरू होण्याबाबतचे नियोजन न झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व संचालक मंडळाच्या घरांवर मोर्चे काढू.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here