दत्त सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून ११ उमेदवारांची माघार

कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी ११ उमेदवारांनी माघार घेतली. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर चिन्हांचे वाटप होणार आहे. दरम्यान, सत्तारूढ दत्त शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार व विद्यमान संचालक इंद्रजित पाटील, रणजित कदम आणि सुरेश कांबळे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा आता होणार आहे.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी ऊस उत्पादक अ वर्ग सभासद गटातून ७, तर मागासवर्गीय गटातून १ अर्ज माघार घेण्यात आला. महिला ऊस उत्पादक गटातून २ तसेच ब वर्ग संस्था गटातून १ अर्ज असे एकूण ११ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. ऊस उत्पादक अनु. जाती गटातून सत्ताधारी दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सुरेश सदाशिव कांबळे तसेच ब वर्ग संस्था गटातील उमेदवार व कारखान्याचे विद्यमान संचालक रणजित कदम, इंद्रजित पाटील यांचे एकमेव अज असल्याने या तिन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवड होणार आहे. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी ब व‍ गटातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून ते ऊस उत्पादक वर्ग गटातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here