‘घोडगंगा’ कारखान्याला कर्ज शिफारशीसाठी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रयत्न चालवले आहेत. या अनुषंगाने पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सुमारे १८ हजार सभासद शेतकऱ्यांचा आधार असलेल्या कारखान्याला कर्जासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडे शिफारस करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे समजते.

शरद पवार यांनी लक्ष घालत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. शिरूरचे आमदार अॅड. अशोक पवार, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी कर्जासाठी ‘घोडगंगा’ची शिफारस केंद्राकडे करावी, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली. न्हावरे येथील हा कारखाना मागील २०२३-२४ यावर्षी बंद होता. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस दुसरीकडे द्यावा लागला. कारखान्याला मागणी करूनही एनसीडीचीचे कर्ज नाकारण्यात आले होते. यंदा राज्य सरकारने अठरापेक्षा जास्त कारखान्यांच्या कर्जासाठी केंद्राकडे शिफारस केली आहे. राज्य शासन यासाठी केंद्राला कर्ज थकहमी देते. तसाच प्रस्ताव ‘घोडगंगा’चा आहे. हा कारखाना २०२३ मध्ये एनपीएमध्ये नव्हता. कारखान्याला मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here