विश्वास साखर कारखान्याने महिला शेतकऱ्यांना दिली ऊस शेती प्रशिक्षणाची संधी

सांगली : महिला शेतकऱ्यांनी प्रगत ऊस शेतीचे प्रशिक्षण घेवून आपल्याला मिळालेले ज्ञान कारखाना कार्यक्षेत्रातील इतर महिलांना देवून त्यांना आधुनिक शेती व्यवसायात पारंगत करावे, असे आवाहन विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी कार्यक्षेत्रातील महिला शेतकरी रवाना झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होते.

पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा साखर संस्थेमार्फत महिला व पुरुष शेतकऱ्यांना ऊस शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञान, संकरित बियाणे, शेती व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण दिले जाते. २३ ते २६ जुलै या कालावधीत हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील महिला प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या. मुख्य शेती अधिकारी ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. संचालक नाईक व कार्यकारी संचालक पाटील यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. मुख्य लेखापाल भानुदास पाटील, जैविक खत प्रकल्प प्रमुख विवेक यादव, सम्राट गायकवाड, प्रतीक पाटील, सूरज पाटील, राहुल पाटील, मयूर संकपाळ आदी उपस्थित होते. उप विकास अधिकारी संदीप पाटील यांनी आभार मानले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here