सातारा: येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २४ महिला शेतकरी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरास रवाना झाल्या आहेत. या चार दिवसीय शिबिरासामध्ये या महिला शेतकऱ्यांना अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे मिळणार आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतकऱ्यांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
कारखान्याच्यावतीने प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना झालेल्या महिलांना चेअरमन डॉ. भोसले, संचालक बाजीराव निकम, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कारखान्यामार्फत अत्यल्प दरात फवारणीची सोय करण्यात आली आहे. इफ्फ्को कंपनी व कृष्णा कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे सभासद शेतकऱ्यांना अत्यल्प दरात इफ्फ्को उत्पादने व कारखाना उत्पादित जिवाणू खते फवारणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.