सोलापूर : उजनीतील पाणी पातळी वाढली, मोहोळ परिसरातील ऊस लागणीला गती

सोलापूर: उजनी धरण उपयुक्त पाणीपातळीत आल्याने शेतकरी सुखावले आहेत. विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे दिसत आहे. एक एकर ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना नांगरणी, रोटरणी करून सरी सोडून, बेणे तोडून, बुडवून घेण्यापर्यंत एकरी २० हजार रुपयांचा खर्च येत आहे. सद्यस्थितीत मोहोळ तालुक्यात चार कारखान्यांकडे ३,७७५ एकरावर ऊस लागवड झाल्याची नोंद झाली आहे. मोहोळ परिसरातील ऊस लागणीला गती आली आहे.

मोहोळ तालुक्यातील पापरी, खंडाळी, देवडी, आष्टी या परिसरातील बहुतांश ऊस उन्हाळ्यात चाऱ्यासाठी तोडण्यात आला होता. मात्र यंदा हा भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जाईल अशी स्थिती आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी खोडवा ऊस मोडला आहे. त्यामुळे आता ऊस लागवड वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील ‘जकराया’ कारखान्याकडे ९०० तर ‘भीमा’ कारखान्याकडे ८७५ एकर उसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील लोकनेते कारखान्याकडे १५०० एकर, टाकळी सिकंदरच्या भीमा कारखान्याकडे ८७५ एकर, आष्टीच्या आष्टी शुगरकडे ५०० एकर, तर वटवटेच्या जकराया शुगरकडे ९०० एकराची नोंद झाली. आतापर्यंत ३,७७५ एकर क्षेत्रावर नवीन लागणी झाल्या आहेत. उजनी धरणाचे पाणी वाढले आहे. नदीकाठ आणि कालव्याच्या परिसरातील शेतकरी ऊस लागणी मोठ्या प्रमाणात करत आहेत, असे जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here