कोल्हापूर: आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी साखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक प्रकाश पताडे, सोमनाथ पाटील, काशिनाथ कांबळे, मंगल आरबोळे यांना त्यांच्या घरी भेटून निवेदन दिले. गेल्या हंगामात साखर उत्पादन होऊन विक्री सुरू झाली की रीतसर पगार देऊ,असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र,ते पाळलेले नाही. त्याची कार्यवाही केली नसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आमचा ११ एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२३ अखेरचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २३ अखेरील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कारखान्याने भरलेली नाही. हंगामी कर्मचाऱ्यांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाउन्स मिळालेला नाही.त्यांचा पीएफ सुद्धा भरलेला नाही. ११ जुलै २०१३ पासून कामगारांनी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले होते.मात्र, पाच ऑगस्टला संचालकांशी झालेल्या चर्चेनुसार हंगाम सुरू करण्यासाठी कामगारांनी सहकार्य केले. मात्र,कारखाना सुरू होऊन साखर विक्री झाली तरी पगार मिळालेला नाही.तातडीने पगार देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, उपाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की,अध्यक्ष शहापूरकर यांनी अहमदाबाद येथील ट्रस्टकडून ३०० कोटींचे कर्ज आणण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आंदोलनाची घाई करू नका.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.