2024-25 हंगामात साखरेचे एकूण उत्पादन 333 लाख टन होण्याचा अंदाज : ISMA

नवी दिल्ली: इंडियन शुगर मिल्स अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने 2024-25 साखर हंगाम (SS) साठी आशादायक दृष्टीकोन जाहीर केला आहे. ज्यामध्ये जून 2024 च्या अखेरीस प्राप्त झालेल्या उपग्रह छायाचित्रांवर आधारित 2024-25 हंगामासाठी भारतातील एकूण ऊस क्षेत्र 56.1 लाख हेक्टर इतके असून एकूण साखरेचे उत्पादन अंदाजे 333 लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एकूणच ऊस पिकाची स्थिती चांगली आहे. याशिवाय, गतवर्षीच्या तुलनेत मोलॅसेस आणि खांडसरीकडे ऊस जाण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी अपेक्षित आहे. ज्यामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील उसाचे क्षेत्र अनुक्रमे सुमारे 13% आणि 8% कमी झाले आहे. तथापि, चालू वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा सुमारे 30% जास्त आहे. यामुळे ऊस उत्पादकता आणि साखर रिकवरी यात लक्षणीयरीत्या वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्र कमी असले तरी दोन्ही राज्यांमध्ये साखरेचे एकूण उत्पादन केवळ 3-5% कमी होण्याची अपेक्षा करतो.अन्य राज्यात उसाचे क्षेत्र आणि उत्पादनात किरकोळ फेरबदल अपेक्षित आहेत आणि एकूण स्थिरता अपेक्षित आहे.एकंदरीत, 2024-25 साठीचे ‘इस्मा’चे सध्याचेअंदाज काही महिन्यांपूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक आशावादी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here