STAI तर्फे जयवंत शुगर्स लिमिटेडचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे ‘ISGEC GOLD MEDAL-Engineering for Excellence’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर: सातारा जिल्ह्यातील कराड येथील सी. एन. देशपांडे, प्रेसिडेंट, जयवंत शुगर्स लि., आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना यांना दि शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) नवी दिल्ली या संस्थेकडून साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी “ISGEC GOLD MEDAL-Engineering for Excellence” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाच्या साखर आणि संबंधित उद्योगांच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

30 जुलै 2004 रोजी जयपूर प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (जयपूर, राजस्थान) येथे STAI च्या 82 व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात देशपांडे यांना हा पुरस्कार शिवाजीराव देशमुख, ॲडव्हायझर, वसंतदारा शुगर इन्स्टिटयूट मांजरी बु. पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी निराणी ग्रुपचे मा. संगमेश आर. निराणी, STAI चे प्रेसिडेंट मा. संजय अवस्थी VSI चे डायरेक्टर जनरल मा. संभाजीराव कडूपाटील, NSI च्या डायरेक्टर डॉ. सीमा परोहा, IIST चे डायरेक्टर मा. आर विश्वनाथांन आणि Yadu Corporation चे CMD मा. कुणाल यादव आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार सी. एन. देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. तनुजा चारुदत्त देशपांडे यांनी स्विकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here