कृष्णा सहकारी कारखाना परिसरात सुरक्षिततेसाठी हायमास्ट दिव्यांची सुविधा

सातारा: रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा सहकारी साखर कार्यस्थळावर नवीन आठ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याच्या कार्यस्थळावर पूर्वी चार हायमास्ट दिवे होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी नवीन आठ हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत.

आता एकूण १२ हायमास्ट दिव्यांमुळे कृष्णा कारखान्याचा परिसर उजळून निघाला आहे.याप्रसंगी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संजय पाटील, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, अविनाश खरात, विलास भंडारे, सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले, रंजन दातार, अनिल पाटील, ऋषिकेश दातार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here