पुणे: राज्य सरकार आणि साखर संघाकडून साखर कामगार व उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांतील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे साखर कामगारांनी बुधवारी, दि. 8 रोजी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती कारखान्याच्या गेट सभेत साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी ही माहिती दिली. सोमवारी कामगारांची गेट सभा झाली.
उपाध्यक्ष रणवरे यांनी सांगितले की, साखर कामगारांचा वेतनवाढ व सेवा शर्तीचा त्रिपक्षीय करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. ४० टक्के पगारवाढ व अन्य सेवा शर्ती मिळण्यासाठी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार, राज्य सहकारी साखर कारखाना संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार संघाने साखर कामगारांच्या इशारा मोर्चा काढला जाईल. यावेळी सतीश गावडे, रामचंद्र चोपडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक, स्वप्निल गावडे, लक्ष्मण टकले, जनार्दन इंगळे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.