NFCSF कडून उच्चांकी ऊस गाळपासाठी विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरस्कार

सोलापूर : नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) कडून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर या युनिट क्र. एकला २०२२-२३ या गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप व उच्च साखर उताराचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांच्या हस्ते व नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने गळीत हंगामात १८ लाख ४१ हजार ४२० मे. टन इतके विक्रमी ऊस गाळप केले होते. त्याआधारे विठ्ठलराव शिंदे कारखान्याची विक्रमी ऊस गाळप पुरस्कारासाठी निवड झाली होती. पुरस्कार वितरणप्रसंगी विक्रमसिंह शिंदे, पोपट गायकवाड, शिवाजी डोके, रमेश येवले-पाटील, वेताळ जाधव, लक्ष्मण खुपसे, विष्णु हुंबे, सुरेश बागल, पोपट चव्हाण, संदीप पाटील, सचिन देशमुख, पांडुरंग घाडगे, लाला मोरे उपस्थित होते.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here