सोमेश्वर साखर कारखाना बांधणार २० लाख लिटरचे शेततळे : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून वाघळवाडी येथील ‘नक्षत्रवन’ उद्यानातील झाडांकरिता पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधण्यात येत आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणाऱ्या शेततळ्यामुळे वृक्षारोपणासाठी पाण्याची व्यवस्था होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ७० एकरावर सर्व झाडांना ठिबकद्वारे पाणी देणार आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे. उद्यान निर्मितीसाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

सरपंच हेमंत गायकवाड म्हणाले, ‘नक्षत्रवना’चे काम लवकर सुरू होणार आहे. त्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पर्यावरण समृद्ध करण्यासाठी कारखाना करत असलेल्या मदतीबाबत सरपंच गायकवाड यांनी आभार मानले. ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच गणेश जाधव, वनरक्षक माया काळे, सिव्हिल इंजिनिअर धनंजय होळकर, सदस्य अनिल शिंदे, तुषार सकुंडे, शिवाजी काकडे, नंदकुमार गायकवाड, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here