फिलिपाइन्स : साखर आयात कार्यक्रमाचा स्थानिक व्यापाऱ्यांना होणार फायदा

मनिला : साखर नियामक प्रशासनाच्या (एसआरए) दाव्यानुसार, रिफाईंड साखरेच्या आयातीमुळे व्यापाऱ्यांना त्यांचा खर्च वसूल केल्यानंतर आणि तोट्यात कच्ची साखर अमेरिकेला पाठवल्यानंतर आयातीमधून थोडा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत नियमाकांनी म्हटले आहे की, ज्यांनी यूएस निर्यात व्यापारात भाग घेतला होता. या व्यापाऱ्यांना रिफाईंड साखर आयात करण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे त्यांना लागणारे पैसे आणि इतर शुल्क यांपासून त्यांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी थोडा लाभ मिळू शकेल.

एसआरएने गेल्या आठवड्यात, २,४०,००० मेट्रिक टन (एमटी) शुद्ध साखर आयात करण्यास मान्यता दिली. यापैकी, सुमारे १,७६,००० मेट्रिक टन साखर बंद हंगामात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही पुरवठ्यातील कमतरता पूर्ण करेल. अमेरिकन निर्यात व्यापारातील सुमारे ३० व्यापाऱ्यांनी कच्ची साखर P २,७०० प्रती बॅग सरासरी किंमतीने खरेदी केली आणि प्रती बॅग P १,८००ची यूएस निर्यात किंमत प्राप्त केली. परिणामी P ९०० प्रती बॅग तोटा झाला.

एसआरएचे प्रशासक पाब्लो लुईस एस. अझकोना म्हणाले, जर हवामान चांगले असेल तर अमेरिकन शिपमेंट लोड करण्यासाठी सुमारे १५ दिवस लागतील. आणि माल वाहतूक अमेरिकेत पोहोचण्यासाठी अजून ३० दिवस लागतील. शुगर ऑर्डर तीन अंतर्गत, फिलिपाइन्सला अमेरिकन साखर कोटा पूर्ण करण्यासाठी २५,३०० मेट्रिक टन कच्च्या साखरेची निर्यात करण्याची परवानगी आहे. अमेरिकन कोटा पूर्ण करण्यासाठी फिलिपाइन्सकडे ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे. साखर निर्यात कार्यक्रमात सहभागी होणारे लोक रिफाइंड साखर आयात करण्यास सक्षम असतील. बाकोलोड शहर सरकारने साखर मालवाहतूक करणाऱ्यांसाठी ट्रकवरील लोडिंगचे निर्बंध शिथिल केले आहेत, असे अझकोना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here