शेतकरी बनला उर्जादाता : इथेनॉल उत्पादन वाढीसाठी सरकारची ब्लू प्रिंट तयार!

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या प्रमाणाबाबत सरकारने योजना तयार केली आहे. आता याबाबतचा नवा अहवाल आला असून, त्यानुसार २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर अधिकाधिक उसाचा वापर करावा लागणार आहे. देशातील डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न आहे. यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या इंधनात इथेनॉलचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. तरच कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा खर्च कमी करता येईल. त्यासाठी त्यांनी ब्लू प्रिंट तयार केली आहे.

‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिसिल रेटिंग्सने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे किंवा त्याचा पुरवठा वार्षिक ९९० कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्यासाठी धान्य आणि ऊस फीडस्टॉक या दोन्हींचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पुढील हंगामात धान्यापासून वार्षिक इथेनॉल उत्पादन ६०० कोटी लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या हंगामासाठी उत्पादन अंदाज ३८० कोटी लिटर आहे. उर्वरित प्रमाण उसापासून इथेनॉलवर प्रक्रिया करून तयार करावे लागेल, जे पुरेशी क्षमता पाहता व्यावहारिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here