आधुनिक तंत्रज्ञानासह साखर उद्योगात क्रांती घडविण्याचे ‘उदगिरी शुगर्स’चे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांचे लक्ष्य

मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योगाने स्थानिक अर्थव्यवस्थेबरोबरच लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी आर्थिक क्रांती केली आहे. याच क्षेत्रात डॉ. राहुल कदम हे परिवर्तनकारी उद्योजक म्हणून उदयास आले आहेत. शेतीशी संबंधीत पार्श्वभूमीमुळे कृषी क्षेत्रातील आव्हानांची सखोल जाण असलेल्या डॉ. कदम यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून या क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

कम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी, मार्केटिंग आणि मानव संसाधनातील एमबीए आणि व्यवस्थापनात पीएचडी असे वैविध्यपूर्ण शिक्षण असलेले डॉ. राहुल कदम यांनी उद्योग अने नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या आहेत. खानापूर जिल्ह्यातील उदागिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड या कंपनीचे संस्थापक, चेअरमन म्हणून २०११ मध्ये डॉ. राहुल कदम यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. त्यांचे वडील डॉ. शिवाजीराव एस. कदम यांनी ही कंपनी स्थापन केली आहे.

डॉ. कदम यांनी २०१४ मध्ये चेअरमन म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कंपनीच्या कामकाजाला लक्षणीय गती दिली आहे. त्यांचे वडील डॉ. शिवाजीराव एस. कदम हे मार्गदर्शक संचालक म्हणून भूमिका बजावत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षमतेला प्राधान्य देऊन साखर उत्पादनात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट डॉ.कदम यांनी ठेवले आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले रोटरी पार्टिकल्स कलेक्टर (RPC) आणि १७० KLPD क्षमतेचे स्प्रे-ड्रायर वापरण्याचा मान या कंपनीने मिळवला आहे. कंपनीने कंडेन्स्ड पॉलिशिंग युनिट (CPU) साठी MBR-आधारित तंत्रज्ञानदेखील स्वीकारले आहे. यातून प्रत्येक हंगामात १५ कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे.

शिवाय, ईआरपी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कारखान्याच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. डॉ. कदम यांच्या मते, यश म्हणजे केवळ टप्पे गाठणे नव्हे, तर नवनवीन मानके स्थापित करणे आणि नवनिर्मितीच्या सीमा ओलांडणे. डॉ. कदम हे भविष्याचा वेध घेत उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे कार्य अन्न उत्पादनापासून ते इंधन क्षेत्रापर्यंत विस्तारत आहेत. त्यांच्याकडून तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक वापराचा उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार, बायोमास प्रकल्पासाठी ग्रीन एनर्जी इंडिया पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सह-उत्पादन ऊर्जा प्रकल्प पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पर्यावरण अनुकूल साखर कारखाना पुरस्कार मिळवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कदम यांच्या योगदानाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ आणि साखर उद्योग यंग आयकॉन पुरस्कारानेही गौरव करण्यात आला आहे. 40 अंडर 40 इंडिया २०२४ च्या यादीत त्याचा समावेश केल्याने त्यांचा प्रभाव आणखी ठळक झाला.

डॉ. कदम यांनी साखर उद्योगाबरोबरच रिअल इस्टेट आणि शिक्षण क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाआहे. इंदूरमधील शिवाजीराव कदम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (SKITM) हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे, जो शिक्षणाप्रती त्यांची बांधिलकी दर्शवतो. त्यांचे परोपकारी प्रयत्न तितकेच प्रभावी आहेत. ज्यात शाळांना देणगी, रुग्णवाहिकांची तरतूद आणि वंचित ग्रामीण समुदायांच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्य यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here