मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे शासनाने दिलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा २०२२-२३ चा कृषी व अकृषी विद्यापीठांचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी २४ सप्टेंबरला पुरस्कार वितरण होईल.
तसेच २०२२-२३ वर्षासाठीचा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून राज्य पुरस्कार डॉ. महावीरसिंग चौहान यांना जाहीर झाला आहे. ते कृषी रसायनशास्त्र व मृदशास्त्र विषयात एमएस्सी अॅग्री व पीएचडी असून एकूण त्यातील ६ वर्षांपासून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे.
चौहान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ५५ वर्षांनी त्यांनी विद्यापीठासाठी विद्यापीठ गीत लिहिलेले आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव अरुण आनंदकर, राज्याचे एनएसएसप्रमुख डॉ. नीलेश पाठक आदींनी स्वागत केले.