सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना बचत, काटकसर आणि नेटक्या नियोजनाद्वारे प्रगतीपथावर पोहचला आहे. सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच प्रगतीचा कारखान्याच्या आलेख चढता राहिला आहे. आता कारखान्याची गाळप क्षमता १० हजार मे.टन प्रतिदिन एवढी वाढविण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉलमध्ये कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या तसेच कारखान्याला विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या विविध गावातील १९ शेतकऱ्यांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सभेत कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जि. प. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. माजी व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, दादा शेळके, राहुल शिंदे, लालासाहेब पवार, अरुण कापसे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, वसंतराव टिळेकर, पद्मसिंह फडतरे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.