पुणे : दौंड येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला पु्ण्यातील दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्यावतीने (डीएसटीए) देण्यात येणारा सन २०२४ चा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डीएसटीए देशपातळीवर साखर उद्योगाच्या विकासासाठी कार्य करणारी संस्था असून, पुणे येथे संस्थेचे ६९ वे वार्षिक अधिवेशन झाले. यावेळी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना या वेळी सन्मानित करण्यात आले.
श्रीनाथ कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्यावतीने कारखान्याचे संचालक महेश करपे, संचालक भगवान मेमाणे, लक्ष्मण कदम, चंद्रकांत ढमढेरे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी पुरस्कार हा स्वीकारला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, डीएसटीएचे अध्यक्ष शहाजीराव भड यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीनाथ कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मते, टेक्निकलचे सरव्यवस्थापक आर. एन. यादव, डिस्टिलरी व बायप्रॉडक्ट्सचे सरव्यवस्थापक आर. एस. शेवाळे, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, एन. ए. भुजबळ आदी अधिकारी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.