इथेनॉल वापराने कारचा इंधन खर्च निम्म्यावर येणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

नवी दिल्ली : येत्या काळात जास्तीत जास्त वाहने इथेनॉलवर चालतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते म्हणाले की, पर्यायी इंधनामध्ये जे काही इंधन उपलब्ध आहे ते अत्यंत स्वस्त आहे. इलेक्ट्रिक एनर्जी पर्यायही स्वस्त आहे. त्याचे शुल्क प्रति युनिट २ रुपये ८० पैसे आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसचा प्रती किलोमीटर खर्च ११५ रुपये आहे. तर एसीशिवाय चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा खर्च ३९ रुपये प्रती किमी आहे. एसी बसचा खर्च ४१ रुपये प्रती किमी आहे. परंतु ही किंमत अनुदानासह आहे. त्याचा मूळ खर्च ६१ रुपये प्रती किमी इतकी आहे. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचा वापर केला गेला तर प्रवासाचा खर्च अर्ध्यावर येईल, असे त्यांनी सांगितले.

एबीपी लाइव्ह इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पर्यायी इंधनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, माझी कार इथेनॉलवर चालते. जर तुम्ही या कारची पेट्रोलशी तुलना केली तर तिचा खर्च हा २५ रुपये प्रती किलोमीटर आहे. एक लिटर इथेनॉलची किंमत ६० रुपये आहे, तर पेट्रोलचा दर १२० रुपयांच्या वर आहे. यावेळी गडकरी यांनी लोकांना जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे आवाहन केले. यासाठी किंमतीवर आणि जीएसटीवर सूट यासारख्या गोष्टींवर अधिक भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. आता कंपन्या नवीन कार खरेदीवर १.५ टक्के ते ३.५ टक्के सूट देत आहेत. परंतु ही सवलत तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमची जुनी कार स्क्रॅप कराल असे त्यांनी स्पष्ट केले.

इथेनॉल  इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here