बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या शिफारशीनुसार येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात कामगारांना वेतन व इतर सोयी सुविधा वेळेवर देण्यासाठी योग्य नियोजन केले जाते. ही समाधानाची बाब आहे, अते प्रतिपादन कर्नाटक स्टेट शुगर वर्क्स फेडरेशनचे अध्यक्ष बी. नागराजू यांनी व्यक्त केले. हालसिद्धनाथ साखर कारखान्यास अनौपचारिक भेट देऊन हालशुगर वर्क्स युनियन, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीनंतर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, व्हा. चेअरमन पवन पाटील, संचालक समीत सासने यांची कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेवून कामगारांच्या समस्याबाबत चर्चा केली.
कर्नाटक सरकार, साखर कारखाना प्रतिनिधी व कामगार संघटना पदाधिकारी त्रिपक्षीय बैठकीत नवीन वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी अंतिम चर्चा करून नव्या वेतन श्रेणीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे बी. नागराजू यांनी सांगितले. यावेळी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी आढावा घेतला. कामगार अधिकारी बसवराज येडुरे, सागर जाधव, कामगार संघटनेचे सचिव शिवगोंडा पाटील, श्रीधर खवरे, भरत पाटील, जयवंत पाटील, राजगोंडा पाटील, दीपक नेसरे, विश्वास गिजवणे, राजू मलाबादे, रावसाहेब जाधव, सुभाष मगदूम, संतोष पाटील, सखाराम पाटील, पैलवान वसंत पाटील, दत्ता देसाई, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, प्रसाद सदावर्ते आदी उपस्थित होते.