साओ पाउलो :ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीत ब्राझीलच्या मुख्य केंद्र-दक्षिण प्रदेशात एकूण ३.११ दशलक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले असे युनिका उद्योग समूहाने बुधवारी सांगितले. ऊसाच्या उत्पादनात विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा १०.२ टक्के अधिक घट या कालावधीत दिसून आली आहे. याबाबत युनिकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, उसाचे गाळप ८.६ टक्के घटून ४२.८३ दशलक्ष टन झाले आहे. तर एकूण इथेनॉल उत्पादन २.१९ टक्क्यांनी घटून २.३० अब्ज लिटर झाले.
दरम्यान, हे आकडे बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी आहेत. एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सने केलेल्या विश्लेषणात या कालावधीत साखरेचे उत्पादन ३.२९ दशलक्ष टन आणि एकूण गाळप ४५.७९ दशलक्ष टन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. युनिका उद्योग समुहाने म्हटले आहे की, ऑगस्टच्या सुरुवातीस उसाच्या सरासरी उत्पादनावरून असे दिसून येते की एक वर्षापूर्वीच्या तुलनेत १२.२ टक्के घसरणीसह ८६.६ टन प्रती हेक्टर उत्पादन झाले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीस कमी झालेले या प्रदेशातील उसाच्या शेतात अलीकडे लागलेल्या आगीशी संबंधित नाही. कारण त्याचा परिणाम पुढील पंधरवड्यात दिसून आला.