लवकर पक्व होणाऱ्या कोसी ६७१, एमएस १०००१ ऊस लागवडीस प्राधान्य द्या : डॉ. आंबेडकर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे

धाराशिव : शेतकऱ्यांनी कमी खर्चात व कमी पाण्यात जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन कसे घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. लवकर पक्व होणाऱ्या कोसी ६७१ व एमएस १०००१ या ऊस जातीच्या लागवडीला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांनी केले. केशेगाव येथे कारखान्याची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची २७ वी अधिमंडळाची वार्षिक बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून गोरे बोलत होते.

अध्यक्ष गोरे म्हणाले की, कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे. टनावरून ५००० मे. टन करणे सर्वांच्या सहकार्यातूनच शक्य झाले आहे. प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी डिस्टीलरीसाठी व शेतीसाठी वापरता यावे यासाठी सीपीयू प्रकल्प उभा केला. बी- हेवी पासून इथेनॉल निर्मितीसाठी १८ लाख लिटर क्षमतेचा स्टोरेज टँक उभारला. परंतू, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे कारखान्यास मोठा तोटा सहन करावा लागल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक एस. पी. डाके यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. मांडलेल्या सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. संचालक अॅड. निलेश पाटील यांनी आभार मानले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here