माळेगाव कारखान्याकडून उर्वरित ३३६ रुपये प्रती टन दिवाळीला एकरकमी देण्याचा प्रयत्न : ॲड. जगताप

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२३ – २४ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रती टन ३६३६ रुपये उच्चांकी दर जाहीर केला आहे. यापैकी ३२०० रुपये यापूर्वीच सभासदांना दिले आहेत. उर्वरीत ४३६ रुपये एकरकमी देण्याची मागणी आहे. मात्र, सभासदांनी ४३६ पैकी १०० रुपये कारखान्याकडे ठेव स्वरूपात ठेवले, तर संचालक मंडळाच्या बैठकीत उर्वरित ३३६ रुपये प्रती टन दिवाळीला एकरकमी देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी केले. कारखान्याने उच्चांकी ३६३६ रुपये दर दिल्याबद्दल पणदरे (ता. बारामती) येथे आयोजित सत्कार समालंभात ते बोलत होते. सभासदांतर्फे अध्यक्ष केशवराव जगताप, संचालक तानाजी काका कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, मंगेश जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

या सभेत सभासदांनी उर्वरित ४३६ रुपये एकरकमी मिळावेत,अशी मागणी केली. त्यावर जगताप यांनी वरील मत व्यक्त केले. कारखान्याचे कामकाज करताना भविष्याचा वेध घेत व्यापारी दृष्टिकोन ठेवून वेळोवेळी सुधारणा करणे गरजेचे आहे. कारखानदारी स्वभांडवली करणे महत्त्वाचे आहे. कारखाना हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. अशोक मुळीक, बाळासाहेब जगताप, शिवाजीराव टेंगले, अशोक जगताप, रोहित कोकरे, सतीश जगताप, जे. पी. जगताप, बापूराव कोकरे, विलास जगताप, अप्पासाहेब जगताप, लक्ष्मण जगताप, अजय सोनवणे, मनोज जगताप, बाबा पाटील जगताप, अभय जगताप, संजय जगताप, राजेंद्र जगताप, शाम जगताप आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here