नवी दिल्ली : मी पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विरोधात नाही, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी स्पष्ट केले. माझ्या विधानांचा कधीकधी चुकीचा अर्थ लावला जातो, असे त्यांनी म्हटले आहे. ACMA च्या ६४ व्या वार्षिक सभेत बोलताना त्यांनी भारताला इंधन आयातीसाठी किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि देशांतर्गत उत्पादित पर्याय शोधण्याची गरज आहे यावर भर दिला. गडकरी यांनी ग्राहक केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचाच आग्रह का धरतात ? असा सवाल केला. बजाज ऑटोच्या सीएनजी मोटारसायकल ‘फ्रीडम’बद्दल, गडकरींनी सांगितले की पेट्रोल मोटरसायकलसाठी किमान २.५ रुपये प्रती किलोमीटरच्या तुलनेत या वाहनाचा खर्च १ रुपये प्रती किलोमीटर आहे.
मंत्री गडकरी यांनी काही कृषी उत्पादन ऊर्जा क्षेत्राकडे वळवण्याच्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, भारतातील ६५-७० टक्के लोकसंख्या शेतीमध्ये काम करते, परंतु जीडीपीमध्ये त्यांचे योगदान केवळ १२ टक्के आहे. त्यामुळे उसाच्या रसापासून इथेनॉल, मोलॅसिसपासून इथेनॉल, मक्यापासून इथेनॉल यासारखे शेतीत (उत्पादन) ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रात काही वैविध्य आणण्याची गरज आहे. मंत्री गडकरी म्हणाले, गेल्यावर्षी मक्याचा भाव १२०० रुपये प्रती क्विंटल होता. व्यावसायिक किंमत एमएसपीच्या खाली होती. आज मक्यापासून इथेनॉल उत्पादनामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशात २,८०० रुपये प्रती क्विंटल भाव आहे. शेतकऱ्यांना आता दुप्पट भाव मिळत आहे. त्याच वेळी आम्ही आमची आयात कमी करत आहोत. मी कोणाच्या विरोधात नाही. पण आर्थिक व्यवहार्यता असताना, तुम्हाला चांगली बाजारपेठ मिळत असताना मग तुम्ही फक्त पेट्रोल आणि डिझेलचाच आग्रह का धरता, तुमच्याकडे पर्याय असले पाहिजेत.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.