बिहारचे शेतकरी करणार उत्तर प्रदेशातील आधुनिक ऊस लागवडीचा अभ्यास

पूर्व चंपारण : बिहार सरकारने ऊस आणि इथेनॉल उद्योगाला चालना देण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. या अंतर्गत बिहारमधील शेतकरी उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादनाचा अभ्यास करणार आहेत. मुख्यमंत्री ऊस विकास योजना २०२४-२५ अंतर्गत आंतरराज्यीय एक्स्पोजर व्हिजिट कम प्रशिक्षणासाठी ४० शेतकऱ्यांचे पथक सोमवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील ऊस संशोधन परिषदेसाठी रवाना झाले.

या शेतकऱ्यांमध्ये एचजीसीएल सुगौली युनिट क्षेत्रातील दहा, माझौलिया युनिट क्षेत्रातील दहा, सिधवालियामधील दहा आणि गोपालगंज भागातील दहा शेतकऱ्यांचा समावेश आहे. शहाजहांपूरमधील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेत पुढील सात दिवस शेतकरी उसाच्या नव्या लागवड पद्धतीचा अभ्यास करतील. सुगौली शुगर युनिटचे ऊस विभागाचे उप सरव्यवस्थापक संजीव कुमार यांनी सांगितले की, या पथकात साखर कारखान्यांचे अधिकारी, गोपालगंज येथील अमरेंद्र सिंग, सिधवालियाचे करण, मझौलियाचे सुधीर मिश्रा आणि एचपीसीएल सुगौलीचे अधिकारी विनय कुमार सिंग यांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here