ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची सव्वापाच लाखांची फसवणूक

सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्याची उस तोडीकरीता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. २०१४ ते २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. जगन्नाथ दादू मस्कर (रा. हायस्कूल रस्ता, समडोळी, ता. मिरज) यांनी याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकादम बबन किसन राठोड (५०, रा. वडवणी, कानिफनाथ तांडा, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित बबन राठोड याने मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन जगन्नाथ मस्कर यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यावर संशयित बबन राठोड याने मजूर पुरविले नाहीत. मस्कर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सत्तर हजार रुपये परत केले. त्यानंतर उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मस्कर यांनी संशयित राठोड याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here