सुंगाई बुलोह : शर्करायुक्त पेयांवर आणखी एक नवीन कर प्रस्तावित करण्यात आला आहे, असे मलेशियाचे आरोग्य मंत्री दाटुक सेरी डॉ. जुल्कफ्लाय अहमद यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कराला साखर-गोड पेय (एसएसबी) कर म्हटले जाईल. हा कर आगामी अर्थसंकल्प २०२५ मध्ये सादर केला जाईल.मंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प २०२४ च्या एसएसबीसाठी १० सेनच्या वाढीनंतर आला आहे. त्याला प्रती लिटर ५० सेनपर्यंत वाढविण्यात आले होते. त्यामुळे देशभरात गोड पेयांच्या वापरामध्ये ९.२५ टक्के घट झाली होती, हा कर मलेशियातील गैर-संसर्गजन्य रोग कमी करण्याच्या मंत्रालयाकडील उपाय योजनेचा एक भाग आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, एसएसबीच्या माध्यामातून लोकांमध्ये साखरेचा वापर कमी करण्यास यश मिळाले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या प्रशिक्षण संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मंत्र्यांनी सांगितले की, एसएसबीमध्ये आणखी एका वाढीमुळे, आम्ही अधिक रेस्टॉरंट्स आणि लोकांना साखर वापराबाबतीत अधिक संयम ठेवण्यासाठी प्रेरित करू, अशी आशा करतो. यामुळे मंत्रालयाने अन्न आणि शीतपेयांसाठी न्यूट्री-ग्रेड प्रणालीचा प्रस्तावित परिचय देखील जोडला आहे, जे उत्पादनातील साखर सामग्रीवर आधारित अन्न उत्पादनाला ए ते डी रेटिंग देईल. ते म्हणाले की, ए दर्जाच्या उत्पादनांमध्ये साखर किंवा कृत्रिम स्वीटनर्स नसतात, तर बी ग्रेडमध्ये कमी प्रमाणात साखर किंवा गोड पदार्थ असतात. सध्या, सुमारे ३.६ दशलक्ष किंवा सहा प्रौढांपैकी एक (१५.६ टक्के) मधुमेहाने ग्रस्त आहे असे यावर्षी मे मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय आरोग्य आणि रोगनिदान सर्वेक्षण २०२३ च्या निष्कर्षांतून दिसून आले आहे. या अहवालात असे आढळून आले की, मलेशियातील पाच लाखांहून अधिक लोक मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा या चार प्रमुख असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त आहेत.