नव्या गळीत हंगामासाठी विठ्ठल कारखान्याची जय्यत तयारी सुरु

सोलापूर : पंढरपूर तालु्क्यातील वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ यासाठी तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत नव्या हंगामासाठी कारखान्याच्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. भगवंत महाराज चव्हाण माळखांबीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील प्रमुख उपस्थित होते.

रोलर पूजन कार्यक्रमाला स्वेरीचे संस्थापक सचिव बी. पी. रोंगे, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमलता शेंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, तुकाराम मस्के, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, गणेश ननवरे, समाधान गाजरे, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील, जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड आदींस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here