अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून ऊस वाढीसाठी अनुदान योजना जाहीर

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळाने आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस लागवड, खोडवा, निडवा पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित ऊस विकास योजना सुरू केल्या आहेत. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी ही माहिती दिली. या अंतर्गत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी प्रती एकरी ५५०० ऊस रोपे (४७२ फुट सरीमध्ये) १.७० पैसे प्रती रोप या दराने शेतकऱ्यांचे बांधावर पोहोच केले जाणार आहेत.

याबाबत अध्यक्ष ओहोळ यांनी सांगितले की, स्वतः ऊस रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी १५० प्लास्टिक ट्रे व २० गोण कोकोपीट ५० टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर दिले जाईल. जे शेतकरी सुपर केन नर्सरीद्वारे ऊस रोपे तयार करणार असतील त्यांना एकरी १५००० रुपये अनुदान दिले मिळेल. जे शेतकरी प्रमाणित बेणे प्लॉटमधील बेणे ऊस लागवडीसाठी विकत घेऊन वापरतील त्यांना बेणे रक्कम म्हणून १ लाख रुपये प्रति एकरी वसुलीचे अटीवर दिले जाते. शेतकऱ्यांना २०२५-२६ गळीताचे उसासाठी ऊस उत्पादकांना ५० टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर प्रती एकरी १ मे टन अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येणार आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ४००० मीटर नॉन आयएसआय पेप्सी लॅटरल ५० टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर देण्याचे धोरण घेतलेले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here