ऑस्ट्रेलिया : विल्मर शुगर आणि साखर कामगारांतील वेतनाचा वाद अखेर मिटला

कॅनबेरा : विल्मर शुगर आणि साखर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीन युनियन्समधील दीर्घकाळ चाललेला पगाराचा वाद मिटला आहे. शुक्रवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बंद झालेल्या दोन दिवसांच्या मतदानानंतर बहुसंख्य विल्मर शुगर आणि रिन्युएबल कामगारांना २५०० डॉलर्सचा ॲडव्हान्स बोनस आणि १६ टक्के वेतन वाढ देणारा नवीन एंटरप्राइझ कराराच्या बाजूने मतदान झाले. मतदानात भाग घेतलेल्या पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५५ टक्के लोकांनी कंपनीच्या तीन वर्षांच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. म्हणजे १,३२० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ख्रिसमसपर्यंत बोनस आणि १२ टक्के वाढ मिळेल. यासोबतच डिसेंबरमध्ये ४ टक्के वाढ होईल.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही मतदानात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानतो, विशेषत: ज्यांनी कंपनीचा प्रस्ताव स्वीकारण्यास मतदान केले. या कालावधीत केवळ आपला व्यवसाय आणि आपल्या लोकांवरच परिणाम झाला नाही तर साखर पुरवठा साखळीसाठी खूप महत्वाचे असलेले उत्पादक आणि ऊस तोडणी ऑपरेटरदेखील प्रभावित केले आहेत. आता या वर्षीच्या ऊसाची तोडणी करण्यावर आणि देशांतर्गत, निर्यातीच्या बाजारपेठेत ग्राहकांसाठी उच्च दर्जाची साखर उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विल्मरच्या आठ कारखान्यांनी अंदाजे ६.३ दशलक्ष टन उसावर प्रक्रिया केली आहे. हा एकूण पिकाचा४० टक्के भाग आहे. कॅनेग्रोव्हर्सचे अध्यक्ष ओवेन मेनकेन्स म्हणाले की, अखेर कामगार आणि कारखानदार दोघांनाही मान्य असलेल्या मार्गाने निराकरण करण्यात आले. हा वाद दीर्घकाळ चालला. आता ऊस उत्पादकांना, कंत्राटदारांना एक मोठा दिलासा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here