कोल्हापूर : रेणुका शुगर्सने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण करून कारखान्याची दररोजची ऊस गाळप क्षमता ५००० मे. टनवरून ७५०० मे.टन केली आहे. यामध्ये कारखान्यास एक रुपयाचीही गुंतवणूक करावी लागलेली नाही. भाडे करार संपताच हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले. कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर केले. त्यावेळी ते बोलत होते.
सभेत सुरुवातीला स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कारखान्याचे प्र. का. संचालक यांनी नोटीस वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी सभेपुढील एक एक विषय वाचले. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. निमशिरगाव येथील स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मारकासाठी ज्या सभासदांना मदत द्यावयाची आहे, त्यांनी जेवढी मदत करावयाची आहे तेवढी रक्कम ऊस बिलातून कपात करण्यासाठी अधिकारपत्र द्यावे. ट्रस्टचे नाव द्यावे, कारखान्यामार्फतही निधी देऊ, अशी घोषणा पी. एम. पाटील यांनी केली. जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, प्रताप ऊर्फ बाबा पाटील, प्रमोद पाटील, एम. आर पाटील, प्रताप नाईक, भूपाल मिसाळ, संतोष महाजन, सुनील तोरगल, प्रकाश खोबरे, रंजना निंबाळकर, शोभा पाटील, सभासद आदी उपस्थित होते. दरम्यान, मंजुरीच्या घोषणासाठी भाडोत्री गुंड आणले अशी टीका माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी केली.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.