पुणे : माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३६३६ रुपये दर नुकताच जाहिर केला. परिणामी बारामतीत गावोगावी शेतकऱ्यांच्या वतीने संचालक मंडळाचे सत्कार होत आहेत. सदोबाचीवाडी – पणदरे (ता. बारामती) येथे ऊस उत्पादक संदीप जगताप, अलंकार जगताप, संग्राम कोकरे आदी गावकऱ्यांनी सत्ताधारी संचालक मंडळाचा नागरी सत्कार आयोजित केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात सहकारी साखर कारखानेही राज्यात विक्रमी दर देण्याची परंपरा जोपासतात. हे बारामतीत माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी दाखवून दिले आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी केले.
सभेत मदनराव देवकाते यांनी विरोधकांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीच्या तुलनेत माळेगावच्या सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात ११८८ रुपये प्रतिटन सभासदांना अधिकचा ऊस दर दिला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांची कारकिर्दी शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर आणावी. त्यांनी निवडणूकीच्या तोंडावर सन २०१८-१९ चा ऊस ३४०० रुपये ओढून तोडून दिला. त्याआगोदर चार वर्षे निच्चांकी दर शेतकऱ्यांच्या माथी मारला. विरोधकांच्या या ऊस दराची तुलना शेकऱ्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू संचालक मंडळाने दिलेल्या ऊस दाराशी करावी. जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, मदनराव देवकाते, तानाजी कोकरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, मंगेश जगताप, महादेव जगताप, कृष्णकांत जगताप, संभाजी जाधव, संदीप घोरपडे, नितीन जगताप, अभिजित भापकर, अशोक जगताप, हरी नाना शेडगे, तुकाराम भोसले, रमेश शिंदे, शशिकांत काळभोर, विलास काळभोर, दिलीप डांगे, वसंतराव राजेमाने, मनोज जगताप, विजयसिंह भोईटे, संग्राम भापकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.