राजारामबापू कारखाना सीबीजी, इथेनॉल निर्मितीवर भर देणार : अध्यक्ष प्रतीक पाटील

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील पाहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यापासून आपली विजेची मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर टाकावू प्रेसमडपासून गॅस निर्मिती (सीबीजी) ही करणार आहोत. कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सिरप व बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार आहे अशी घोषणा अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली. कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. माजी मंत्री आ. जयंत पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे, देवराज पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते.

अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याने आपण रुपये १४७ ची ठेव परत केली असून त्याचे एक वर्षांचे व्याज ऑक्टोबर मध्ये शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत आहोत. प्रति महिना ७ किलो साखर ९ किलो केलेली आहे. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी ऊस उत्पादक सभासदांना दुर्धर आजारासाठी तसेच आरआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सभासदांच्या मुला-मुलींना आर्थिक सहाय्य सुरू केले जाईल. यावेळी आ. जयंतराव पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद करीत मार्गदर्शन केले. पी. आर. पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांची भाषणे झाली. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक माहुली यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सचिव डी. एम. पाटील यांनी इतिवृत्त वाचन केले. संचालक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here