लातूर : मांजरा कारखान्याकडून आणखी १०० रुपयांचा हप्ता देण्याची चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी केली घोषणा

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उपपदार्थांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाडव्यापूर्वी २,६०५ रुपये प्रती टन ऊस दर दिला आहे. आता आणखी १०० रुपयांचा हप्ता लवकरच अदा केली जाईल अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी केली. कारखान्याची ४० वी सर्वसाधारण सभा शनिवारी कातपूर रस्त्यावरील पार्वती मंगल कार्यालयात झाली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, श्रीशैल उटगे आदी उपस्थित होते.

कारखान्याचा एफआरपीनुसार २,५०५ रुपये भाव असताना कारखाना कारखाना २,७०५ रुपये देत असल्याचे चेअरमन देशमुख म्हणाले. आमदार अमित देशमुख म्हणाले की, मांजरा कारखाना ही संस्था विलासराव देशमुख यांनी ४० वर्षांपूर्वी स्थापन केली. चार दशकांपासून आपण दरवर्षी एकत्र येतो. या कालावधीत कसलीही कुरबुर नाही. असे उदाहरण कोठेच नाही. हे केवळ पारदर्शक कारभार आणि एकमेकांविषयीच्या विश्वासामुळे शक्य होते. सभेत खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धीरज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १६.६५ टक्के म्हणजे दोन महिन्यांचा पगार बोनस म्हणून जाहीर करण्यात आला.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here